मी माझ्या Swapnadeep Hospital या official facebook Page वर आणि पथ्यातून आरोग्य या ब्लॉग page वर “पथ्यातून
आरोग्य” हे सदर आज पासून सुरु करतोय. गत ८ वर्षातल्या वैद्यकीय व्यवसायात आलेले
अनुभव, रुग्णांच्या शंकांचे निरसन, आजाराबद्दलचे समज गैरसमज या बद्दल सविस्तर
माहिती मी या सदरातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज सर्व प्रथम मी पथ्य व
अपथ्य या बद्दलची थोडीशी माहिती सांगतोय. “पथ्य” म्हणलं कि रुग्णांच्या कपाळावर
आट्या पडतात कि डॉक्टर आता आपल्याला काय काय खाऊ नका हे सांगतील. पण खरतर पथ्य
म्हणजे काय खावे आणि अपथ्य म्हणजे काय खाऊ नये असा याचा अर्थ असतो. रुग्णांच्या
प्रकृतीचा विचार करून त्यांच्या शरीरासाठी दैनंदिन आहारात आणि विहारात कोणते कोणते
अनिवार्य बदल करावे लागतात ते म्हणजे पथ्य आणि अपथ्य. तुम्हाला वाचताना आश्चर्य
वाटेल कि बरेचसे आजार फक्त पथ्य-अपथ्य पाळून सुद्धा बरे होऊ शकतात. पण आजकालच्या
या गतिमान युगात लोकांना खूप घाई असते. लगेच आजारातून सुटका हवी असते. आपल्या
शरीरात असणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेचा वापर आपण होऊच देत नाही. कालांतराने ही
रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होत जाते आणि दुर्धर आजार निर्माण होऊ लागतात. फक्त
पथ्य-अपथ्य पाळून आपण या रोगप्रतिकारक क्षमतेला बळ देऊ शकतो आणि निरोगी आयुष्य जगू
शकतो.
आज मी सर्वांसाठी एक महत्वाचं पथ्य सांगणार आहे. जे पथ्य सर्व प्रकारच्या
रुग्णांसाठी, निरोगी लोकांसाठी आणि ज्यांना कधी आजारीच पडायचं नाही अशा लोकांसाठी सुद्धा
खूप महत्वाचं आहे. हे पथ्य कोणताही माणूस सहज पाळू शकतो आणि निरोगी आयुष्य जगण्याचा
प्रयत्न करू शकतो. हे पथ्य आहे “निखळ हसणे”. पृथ्वीतलावरच्या इतर प्राण्यात आणि बुद्धीवादी
मानव प्राण्यात जो फरक आहे तो म्हणजे “निखळ हसणे”. याचा वापर करून मनसोक्त हसत रहा
आणि निरोगी आयुष्य जगत रहा.
- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.
No comments:
Post a Comment