“पथ्यातून आरोग्य”च्या मागच्या सदरात मी सर्वांना एक महत्वाचं पथ्य सांगितलं होत, “मनसोक्त हसणं”...... ते किती जणांनी पाळलं......? पाळलं गेलं नसेल तर आता लगेच सुरुवात करा आणि निरोगी रहा. आज मी तुम्हाला अजून एक पथ्य सांगणार आहे. ते आहे “जवस”.
लहान असताना आम्ही भाचे कंपनी सुट्टीला मामाच्या गावी गेलो की आमची आजी आणि मामी दोघी मिळून खूप वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायच्या. आम्ही जायच्या आधी सगळी तयारी करून ठेवायच्या. त्यात एक तयारी आवर्जून असायची, ती म्हणजे “जवसाची चटणी”. आणि कोणाला आवडो न आवडो आमची आजी प्रत्येकाला जवसाची चटणी आग्रहाने वाढायचीच. मला तर जाम आवडायची. तशा जवसाच्या चटणीची चव मी अजून तरी खाल्ली नाही कधी. (बहुतेक प्रत्येकाची आजी अशीच चवदार चटणी करत असेल.) पण हेच जवस आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे आता मोठ झाल्यावर कळतंय. असे बरेच पदार्थ आपल्या आहारातून बाद झाले आहेत. परंतु असे पदार्थ जो पर्यंत आपल्या आहारात होते तोपर्यंत त्याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीराचा समतोल आपोआप साधला जात होता. आज मानवी आजारांचं प्रमाण या पदार्थांच्या कमतरतेमुळेच वाढलं आहे.
जवसामध्ये Omega 3 Fatty acids असतात. ते दम्याच्या रुग्णांना त्रास कमी होण्यास मदत करतात आणि cholesterol level control ठेवून हृद्य विकार टाळता येऊ शकतात. जवसामध्ये fiber असल्यामुळे नियमित जवस खाल्याने बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते आणि पोट साफ होण्यास मदत होते. यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असतात त्यामुळे जवस खाल्ले तर वृद्धापकाळात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. वृद्ध रुग्णांमध्ये अशा तक्रारी सर्वसाधारणपणे असतातच. यात Antioxidants असल्यामुळे आपल लिव्हर सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. या जवसाचा महिलांमध्ये सुद्धा खूप छान परिणाम पाहायला मिळतो. यात Phytoestrogens नावाचे hormones असतात त्यामुळे महिलांना होणारा मासिक पाळीतील त्रास कमी करण्यास मदत होते. जवसामध्ये Lignans नावाचे Antioxidants असतात. जे महिला मध्ये होणाऱ्या स्तनाच्या cancerच्या शक्यतेपासून दूर ठेवण्यास मदत करतात. मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांना होणाऱ्या तक्रारी जवस खाल्याने टाळता येऊ शकतात. सोबतच यामध्ये Iron, Proteins आणि Vitamin B6 असल्यामुळे रक्ताच्या कमतरतेमध्ये सुद्धा जवस उपयुक्त ठरते. जवसामुळे शरीरातल्या द्रव पदार्थाचा समतोल टिकून राहण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचेची कांती वाढते. अशा प्रकारे जवस हे बहुगुणकारी आहे. त्यामुळे याचा वापर नियमित केला तर आजारांपासून दूर राहून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. स्वयंपाक तयार करतानाच जर खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावू शकतो. आपण बडीशोप सोबत जवस मिसळून ठेऊ शकतो आणि जेवण झालं की खाऊ शकतो. कोणत्याही मार्गाने जवस खा. पण अगदी अगत्याने खायला सुरु करा. तर आता खाणार ना जवस......?
- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.

No comments:
Post a Comment