अतिव्यस्त आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे अनेकांना झोप पूर्ण न होण्याच्या तक्रारी सुरू आहेत. त्यात अति विचार, अति मानसिक ताण, अति चिंता या कारणाने रात्री झोप न लागणे आणि परिणामी आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होणे याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत आहे. बऱ्याच संकटांवर मात करत आपण प्रत्येकजणचं या व्यावहारिक विश्वात संघर्ष करत आहोत. गरज नसलेला ताणतणाव, चिडचिड, अतिसहनशीलता, अतिविचार या गोष्टींमुळे मानसिकरित्या आपण कमकुवत होत चाललो आहोत. त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो, पुन्हा जास्त तणाव निर्माण होतो त्याचा झोपेवर परिणाम होऊ लागतो, पुन्हा चिडचिड सुरु होते आणि परिणामी निद्रानाशामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो, मग हे विचित्र कालचक्र सुरुच रहात. या कालचक्रातून बाहेर पडायचं असेल तर तणावमुक्त जीवन जगून पुरेशी शांत झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. या आरोग्याला घातक निद्रानाशापासून मुक्त व्हायचं असेल तर खालील पथ्यापथ्य पाळावीत.
★ काय करणे टाळावे -
● झोपण्यापूर्वी अति मसालेदार आणि अति जेवणे टाळावे.
● रात्री उशिरा जेवणे टाळावे.
● रात्री झोपायच्या आधी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे
● थंड गरम एकत्र खाऊ नका.
● झोपेच्या गोळ्या खाणे शक्यतो टाळावे. जर काही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या सुरू ठेवाव्यात.
● सतत अल्पकाळ झोप घेणे टाळावे.
● झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे.
● व्यसनापासून लांब राहावे.
★ काय करावे -
● जेवण वेळेवर करावे.
● झोपायच्या आधी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
● झोपताना मोबाईल दूर ठेवावा.
● डोळ्यावर पट्टी बांधून झोपावे.
● सकाळी उठण्याच्या आणि रात्री झोपण्याच्या वेळा निरंतर एक सारख्या असाव्यात.
● दिवसभर जर आपण सतत ऍक्टिव्ह राहिलो तर रात्री आपोआप छान झोप लागते.
● झोपण्यापूर्वी डोक्याला आणि तळपायाला तेलाने मसाज करावे.
● म्युसिकची आवड असेल तर रात्री झोपताना हळू आवाजात मनाला आवडेल असेल म्युसिक ऐकावे.
● कोमट पाण्यात एक लिंबू आणि एक चमचा मध मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यावे आणि रात्री जेवणानंतर प्यावे.
● नियमित २० मिनिट ध्यान करावे. २० मिनिटांच्या ध्यानाने ८ तासाच्या झोपेएवढा आराम मिळू शकतो.
● झोप लागण्यासाठी अॅक्यूप्रेशर थेरपीचा आपण उपयोग करू शकतो - रात्री झोपेच्या वेळी उजव्या हाताच्या करंगळीच्या खालच्या उंचवट्यावर डाव्या हाताच्या अंगठ्याने ५ मिनिट मसाज करत राहावे. शांत झोप लागते.
● रात्री झोपेच्या वेळी १० ते १ अशा उलट्या क्रमाने झोप येईपर्यंत अंक मोजत राहावे.
★ कोणाला किती तास झोप पुरेशी आहे? -
● ६ ते ९ वयोगटासाठी - १० ते १२ तास झोप आवश्यक आहे.
● ९ ते १८ वयोगटासाठी - ८ ते १० तास झोप आवश्यक आहे.
● १८ ते ६४ वयोगटासाठी - ६ ते ८ तास झोप आवश्यक आहे.
● ६५ च्या पुढील वयोगटातील व्यक्तींची झोप निसर्गतःच कमी होत जाते.
आपण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती तर केली पण आज याचं तंत्रज्ञानामुळे आपल्या झोपेचे नियंत्रण राहिलेले नाही. आपल्या वाट्याला आधीच मोठा संघर्ष असताना या तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत आहारी जाऊन आपण आपली अमूल्य अशी झोप अस्ताव्यस्त करत आहोत. आजकालच्या तरुणाईमध्ये अति प्रमाणात चिंता करणे, मानसिक ताण घेणे ही निद्रानाशाची कारणे ठरत आहेत. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री नियमित सात-आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर हा "निद्रानाश" म्हणजे रोगाला आमंत्रण ठरेल.
टीप - वरील पथ्यापथ्य सर्वसाधारण आहेत यात आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदल होऊ शकतो. निद्रानाशावरील उपचाराच्या योग्य उपायांसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ संदीप सोमेश्वर टोंगळे.